महाराष्ट्र शेतकर्यांनां आता मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत एक चांगली उत्पन्नाची संधी उपलब्ध आहे. ह्या योजने मुळे आता गावातील शेतकऱ्यांना गावाच्या पडीक माळरानावर एकरी ५०००० रुपये कमवता येईल. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने मुळे आता शेतीला लागणारी वीज आता गावा जवळील जमिनीवर तयार करून शेतकऱ्यांना दिवस अखंड वीज पुरवठा करणे शासनाला आता शक्य आहे. ह्या साठीच उपमुख्यमंत्री ह्या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु केली असून हि महत्वाकांक्षी योजना मिशन २०२५ यामध्ये समाविष्ट करण्यात अली आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना शेतकऱ्यांचा समृद्धी साठी अतिशय उपयुक्त ठरणार असून ही ‘फ्लॅगशीप’ योजना अतिशय प्रभावीपणे सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात यावी अश्या सूचना माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिल्यात.
उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशून म्हणाले कि राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, कारण शेतकरी आणि त्यांची शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजने मुळे आता शेतकर्यां साठी हरित आणि स्वस्त ऊर्जा उत्पादन करणे शक्य होईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा हा शेतकऱ्यांना दिवसा सौर ऊर्जेच्या उपयोग करून वीज उपलब्ध करून देण जिल्हा व्हावा ह्या साठी प्रयत्न करावे.
ह्या योजने मुळे सबसिडीचा भर देखील कमी होईल. जेणे करून उद्योग क्षेत्रावरील वीज भार देखील कमी होऊन राज्यातील उद्योगास चालना मिळेल जास्तीत जास्त सौर ऊर्जा आणण्यावर राज्य शासनाचा भार असेल!