शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सक्षम करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), आणि अॅमेझॉन किसान (Amazon Kisan) यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. ह्या करारांतर्गत आय.सी.ए.आर. म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेला अॅमेझॉन च्या नेटवर्क चा वापर करून शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन वाढी साठी तांत्रिकदृष्ट्या प्रोत्साहन प्रदान करता येईल. शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन अधिकाधिक वाढ करण्यासाठी, आणि अश्या उत्पादन वाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने पिकांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणे करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि जीवनमान सुधारेल.
ह्या करारामुळे ऍमेझॉन फ्रेश वरून भारतीय ग्राहकांना ताज्या आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल. आयसीएआरचे महासंचालक आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ हिमांशू पाठक सांगतात कि शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्यासाठी इतर शेती उत्पादने शेतकऱ्यांनी घ्यावे यावर भर देण्यात येणार आहे. पुढे शेती हंगाम पीक योजनांमधील महत्त्वपूर्ण इनपुटचे महत्त्व अधोरेखित करत डॉ हिमांशू पाठक नमूद करतात कि नवीन माहितीचे हस्तांतरण, तंत्रज्ञान, आणि क्षमता बांधणी यासाठी ICAR अॅमेझॉन सोबत सहयोग करेल.
Amazon आणि ICAR यांच्या सहकार्याने, ICAR च्या संशोधनाद्वारे विकसित केलेल्या नवीन व अचूक शेती पद्धतींचा विस्तार कार्यात येईल. एकात्मिक लागवडी
साठी लागणाऱ्या तांत्रिक ज्ञानातील तफावत भरून करण्यासाठी, आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ICAR च्या कृषी विज्ञान केंद्र ज्ञान (KVK) नेटवर्कचा उपयोग करून घेण्यात येईल. कृषी विज्ञान केंद्रांच्या शेतकरी कार्यक्रमांअंतर्गत ICAR आणि Amazon काम करतील. शेतीच्या पद्धती आणि नफा यात सुधारणा होण्यासाठी विविध चाचण्या, प्रात्यक्षिके आणि क्षमता-निर्माण उपक्रम आयोजित करण्यात येतील.
यासोबतच ऍमेझॉन त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापर करून शेतकऱ्यांसाठी त्यांची उत्पादने विकण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि साहाय्य करेलजेणेकरून शेतकऱ्यांना उपभोक्तानं बरोबर डायरेक्ट कनेक्ट करता येईल..